…तर मुलाने मुलाने मुलासारखे वागावे : नाथाभाऊंचा टोला ( व्हिडीओ )

eknath khadse

जळगाव प्रतिनिधी । गुलाबराव पाटील हे मला वडिलधारे मानत असतील तर त्यांनी मुलासारखे वागावे अशा मिश्कील शब्दांमध्ये टोला मारत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

भुसावळ येथील कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी नाथाभाऊंनी आपल्यावर मुलासारखे प्रेम केले असले तरी मुलगा न मानल्याने त्यांची अशी अवस्था झाली असल्याचे वक्तव्य केले होते. नाथाभाऊंनी याला आज प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, गुलाबराव पाटील हे जिल्हा परिषद सदस्य असतांना भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहून मी त्यांना खूप सहकार्य केले. तेव्हापासूनचे आमचे संबंध आहेत. आता युती नसून दोन्ही पक्ष विलग झाले असल्याने परिस्थिती बदलली आहे. मात्र त्यांना जर मी वडिलधार्‍यासारखे प्रेम केले असे वाटत असेल तर मुलाने मुलासारखे वागले पाहिजे असे ते म्हणाले.

गुलाबराव पाटील यांनी चुकीच्या लोकांमुळे नाथाभाऊंची ही अवस्था झाल्याचे वक्तव्य केले होते. यावर नाथाभाऊ म्हणाले की, मी ४० वर्षांच्या राजकीय जीवनात एकही निवडणूक हरलो नाही. अगदी बाजार समिती पासून ते आमदारकीपर्यंत सर्व निवडणुका या मी जिंकलो. हे यश कार्यकर्त्यांमुळेच मिळाले. मात्र अगदी पाच-सात जणांनी गद्दारी केल्याचा फटका निश्‍चित बसल्याचे नाथाभाऊंनी मात्र मान्य केले.

पहा : नाथाभाऊ नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/477287856298372

Protected Content