जळगाव राहूल शिरसाळे । वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप महिला आघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
आज राज्यभरात आंदोलन करण्यात आले असले तरी फक्त जळगावात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांवर या प्रकरणी राजकीय दबाव असल्याचा आरोप देखील करण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर भारती सोनवणे, भाजप महिला आघाडी उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, महिला आघाडी शहराध्यक्ष दीप्ती चिरमाडे, महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे, जेष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, रेखा वर्मा आदी पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. आम्ही रस्त्यावर उतरलो, आम्ही घोषणाबाजी केली व यानंतर पोलिसांनी आम्हाला पकडले. पोलिसांनी जमावबंदी असल्याने रस्त्यावर उतरू नये असे सांगितले परंतु आम्ही सामान्य मुलीच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलो मात्र तुम्ही बलत्काऱ्याला पाठीशी घालत हा कुठला न्याय आहे असा प्रश्न दीप्ती चिरमाडे यांनी उपस्थित केला. सर्व आंदोलकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे या सारखे सर्व नियमांचे पालन केले होते असे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/142440714405262