तरूणीचा मोबाईल लांबविणारे जेरबंद; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । गणेश कॉलनीत रस्त्याने पायी चालत असलेल्या तरुणीला समोरुन दुचाकीची धडक देऊन तिचा मोबाईल लांबविणार्‍या तीन संशयितांना जिल्हापेठ पोलिसांकडून अटक केली आहे. नितेश मिलिंद जाधव (वय २२), विशाल रवींद्र धनगर (वय २२) व प्रविण गोकुळ कोळी (वय २३) तिघे रा.पिंप्राळा अशी तिघा संशयितांची नावे आहेत.

 

याबाबत माहिती अशी की, पूजा दिलीप भावसार (वय २८,रा, विजय कॉलनी) ही रविवार, १७ ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता घरातून कामानिमित्ताने गणेश कॉलनीत आलेली होती. त्यावेळी समोरुन क्र (एमएच १९ डीके १३८६) या क्रमांकाच्या दुचाकीवरुन आलेल्या तरुणाने पूजाला धडक दिली. त्यात तरुणीच्या हातातील मोबाईल खाली पडला. त्यानंतर संशयितांनी मोबाईल उचलून नेत पोलिसांकडे तक्रार दिली तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिले. तिघेही पसार झाले होते. याप्रकरणी जखमी तरुणीच्या तक्रारीवरुन तरुणांविरुध्द जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांच्या पथकाने दुचाकी क्रमांकावरुन मालकाचा शोध घेऊन तिघं संशयितांना मंगळवारी पहाटे ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.

Protected Content