तरूणाला मारहाण करून लूट करणाऱ्या संशयित आरोपीस अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील के.सी.पार्क परिसरातील तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडून ८०० रुपये लांबविणाऱ्या संशयित आरोपीस शहर पोलीसांनी २४ डिसेंबर रोजी मध्यरात्री अटक केली आहे.

भाग्यवंत उर्फ भैय्या धीरज पाटील, २३, रा. इंद्रप्रस्थ नगर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, पवन बबन आढाळे हा २२ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ९.३० वाजता मेडीकलवरून गोळ्या घेवून घरी परतत असतांना सुरेशदादा जैन यांच्या बंगल्यासमोर भुषण भरत सोनवणे उर्फ अठ्ठा व संदीप मधुकर सोनवणे उर्फ डॉन तसेच भाग्यवंत उर्फ भैय्या या तिघांनी अडविले होते. तसेच दुचाकीला लाथ मारुन पंकज आढाळे याला लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी पट्टीने बेदम मारहाण केली होती. यात पवन गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी शहर पोलीसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी भुषण सोनवणे तसेच संदीप सोनवणे या दोघांना अटक केली होती. यानंतर दोघांची जामीनावर सुटका झाली होती. गुन्हा घडल्यापासून भाग्यवंत उर्फ भैय्या हा फरार होता. त्याच्याबाबत शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पो.कॉ. तेजस मराठे, बशीर तडवी यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ, रतन गीते, योगेश इंधाटे यांच्या पथकासह भाग्यवंत यास अटक केली.

Protected Content