तरूणाच्या हातातील मोबाईल लाबविणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून पायी जाणाऱ्या तरुणाच्या हातातून १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबविणाऱ्या अल्पवयीन मुलाला एमआयडीसी पोलीसात अटक केली आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित नरसिंग पावरा (वय-२७) रा. एम. जे. कॉलेज जवळ जळगाव हा तरुण रविवारी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीकडून कंजरवाडा कडे पायी जात असताना त्याच्या मागून अज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन तरूणाच्या हातातील १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल झटका मारून बळजबरीने हिसकावून लांबविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील फरार दुचाकीधारक भुसावळ रोडकडे जात असतांना हॉटेल गौरव येथे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मुदस्सर काझी, पो.कॉ. किरण पाटील हे गस्तीवर असतांना मोबाईल लांबविणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, योगेश बारी, विकास सातदीव व सुधीर सावळे हे मदत करीत आहे.

Protected Content