जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट जवळील दंत्त मंदीराजवळून एका मजूराची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनोज धोंडू माने (वय-२४) रा. शनीपेठ, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी ३ एप्रिल रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास मनोज हा त्यांची दुचाकी (एमएच १९ सीसी ०४९६) ने शहरातील गोलाणी मार्केटजवळील दत्त मंदीराजवळ आला. त्याठिकाणी त्यांने दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेली ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. त्यानंतर मनोज माने याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी ४ एप्रिल रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील करीत आहे.