उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दोन जणांवर कारवाई

 

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।

 

महावीर जयंतीनिमित्त शहरात मांस विक्री करण्यास बंदी असताना आदेशाचे उल्लंघन करत शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात मांस विक्री करणाऱ्या दोन जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत मंगळवारी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भगवान महावीर जयंतीनिमित्त कत्तलखाने व मांस विक्रीला बंदी करण्या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आदेश काढले होते. या अनुषंगाने मंगळवार ४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुप्रीम कॉलनी परिसरात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे, छगन तायडे हे पेट्रोलिंग करत असताना सुप्रीम कॉलनीमध्ये दोन जण मांस विक्री करताना आढळून आले. एमआयडीसी पोलिसांनी युसुफ जहांगीर पटेल (वय-२७), आणि वसीम हनीफ खाटीक (वय-२७) दोन्ही रा. पोलीस वसाहत, सुप्रीम कॉलनी जळगाव दोघांवर कारवाई केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील करीत आहे.

Protected Content