जळगाव-नशिराबाद रस्त्यावर पोलीसांचे वाहन पलटी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव नशिराबाद रस्त्यावरील कडगाव रस्त्यावर खड्डा आल्याने पोलीस वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने शासकीय वाहन पलटी झाल्याची घटना पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी ५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना जळगाव शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

अधिक माहिती अशी की, यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे यावल तालुक्यातील अट्रावल येथे झालेल्या दंगलीतील फरार तीन संशयित आरोपींना धरणगाव तालुक्यातून ताब्यात घेवून बुधवारी ५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शासकीय पोलीस वाहनाने जळगावकडून यावलकडे जात होते. जळगाव-नशिराबाद गावाजवळील कडगाव गावाजवळून जात असतांना अचानक रस्त्यात आलेल्या खड्ड्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने शासकीय वाहन रस्त्याच्या कडेला जावून पलटी झाले. या अपघातात पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल अशोक बाविस्कर हे जखमी झाले. तर ताब्यात असलेले तीन संशयित आरोपी हे किरकोळ जखमी झाले. दरम्यान, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून संशयित आरोपींना जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content