जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा मढी चौकात तरूणाचा रस्ता आडवून हातीतील सोन्याची अंगठी आणि खिश्यातील रोकड असा एकुण २२ हजारांचा ऐवज सहा जणांनी लटून नेला. या गुन्ह्यात संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २५ एप्रिल रोजी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महेंद्र रामलाल कोंडे (वय-३८) रा. धनगरवाडा, पिंप्राळा, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २४ एप्रिल रोजी रात्री १० वाजता महेंद्र हा पिंप्राळा येथील मढी चौकातून जात असतांना विशाल कोळी, नितेश उर्फ गोल्या जाधव, राकेश जाधव, सचिन चव्हाण, रॉनी सपकाळे, राहूल खवडे यांनी रस्ता आडविला. महेंद्रला धमकी देत त्याच्या जवळील सोन्याची अंगठी आणि रोकड असा एकुण २२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. तसेच पोलीसात तक्रार दिली तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तरूणाने रामानंदनगर पोलीस ठाण्यात ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी विशाल कोळी, नितेश उर्फ गोल्या जाधव, राकेश जाधव, सचिन चव्हाण, रॉनी सपकाळे, राहूल खवडे यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.