जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पैसे सुटे करण्यासाठी गेलेल्या तरुणाला अज्ञात काही जणांनी रस्ता अडवून बेदम मारहाण करत त्याच्या जवळील २ हजार रुपयांची रोकड व मोबाईल जबरी हिकासकावून चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात बुधवारी सायंकाळी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेख मुनिस शेख नसीर (वय-२१, रा. फातिमा वाडी, जामनेर) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पाच जुलै रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शेख मुनिस याला त्याचे वडील यांनी २ हजार रुपयाचे सुटे घेऊन ये, असे सांगितले. त्यासाठी शेख मुनीस हा जामनेर बसस्थानक येथे आला असता काही अज्ञात मुलांनी त्याचा रस्ता अडवून त्याला मारहाण केली. तसेच त्याच्या जवळील मोबाईल व २ हजारांची रोकड जबरीहिसकावून पसार झाले. हा प्रकार घडल्यानंतर शेख मुनीस शेख नासिर याने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात बुधवारी ५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक मोहिते करीत आहे.