जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील हरिविठ्ठल नगरात तरूणाचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील अटक केलेल्या संशयित आरोपी विठ्ठल उर्फ माऊली तुकाराम हटकर (पाटील) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव याला रविवारी २४ जुलै रोजी दुपारी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हरिविठ्ठल नगर परिसरातील गणपती मंदिर बाजार पट्टा परिसरात राहणाऱ्या दिनेश काशिनाथ भोई (वय २८, हरी विठ्ठल नगर, जळगाव) हा तरूण जेवण करून त्याच्या घराच्या ओट्याजवळ शनिवारी २३ जुलै रोजी रात्री ८.३० च्या सुमारास उभा होता. त्यावेळी विठ्ठल उर्फ माऊली तुकाराम हटकर (पाटील) हा दुचाकीवर येवू दिनेशजवळ आला आणि अचानक कंबरेला असलेला कोयत्याने सपासप वार करून पसार झाला होता. जखमी झालेल्या दिनेशला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. काही वेळानंतर संशयित आरोपी विठ्ठल उर्फ माऊल तुकाराम हटकर याला पोलीसांनी अटक केली. त्याच्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी विठ्ठल हटकर याला रविवारी २४ जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.