जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील गोरनाळे येथील तरुणीचे इन्टाग्रामवर बनावट खाते तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवार, १० सायंकाळी ५ फेब्रुवारी रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जामनेर तालुक्यातील गोरनाळे या गावात तरुणी तिच्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. अनोळखी व्यक्तीने तरुणीचे इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाचा तसेच फोटो वापर करत बनावट खाते तयार केले, तसेच तरुणीचे खाते हे खरेच असल्याच भासवून तरुणीच्या मित्र मैत्रिणींसोबत चॅटींग केली. कुणीतरी इस्टाग्रामवर बनावट खाते तयार केल्याचा प्रकार १० फेब्रुवारी आल्यानंतर या प्रकाराबाबत तरुणीने हा प्रकार तिच्या कुटुंबियांना कळविला. त्यानुसार तरुणीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरुन अनोळखी व्यक्तीविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.,