जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पायघन हॉस्पिटल परिसरातून रस्त्यावर उभी ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविल्याप्रकरणी शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे गणेश शशीकांत भारुळे वय ३० हा वास्तव्यास आहे. तो मजुरी काम करतो. २ फेब्रुवारी रोजी जळगावातील पायघन हॉस्पिटल परिसरात आला होता. यादरम्यान त्याने त्याची एम.एच.१९ डी.डब्लू २५८३ या क्रमाकांची दुचाकी याच परिसरात एका पत्र्याच्या शेडच्या जवळ रस्त्यावर उभी केली होती. काम आटोपून परत जाण्यासाठी निघाल्यावर गणेश यास त्याची दुचाकी मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून आल्याने अखेर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री गणेश भारुळे याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुवर्णा तायडे हे करीत आहेत.