मुंबई,/ पुणे लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – भाजपकडून कांदिवली येथे पोलखोल सभा घेण्यात येणार होती, याठिकाणी सभामंडप आणि पोलखोल बस यात्रेवरच हल्ला करण्यात येऊन मोडतोड करण्यात आली, यावर तरीही यात्रा थांबणार नाही असे प्रत्तूत्तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
मुंबई मनपा निवडणूक पार्श्वभूमीवर मविआच्या घटक पक्ष आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच भाजपकडून ‘पोलखोल’ यात्रा सुरु करण्यात आली आहे. या यात्रेच्या बसवर दगडफेक करण्यात आली तर कांदिवली येथे होणाऱ्या सभेसाठी तयार करण्यात येणाऱ्या सभा मंडपाचीदेखील तोडफोड करण्यात आली. भाजपकडून काढण्यात येत असलेल्या पोलखोल बस यात्रेद्वारे तसेच सभेतून बुरखा टराटरा फाटत आहे, यातून हे सर्व घाबरले आहेत, त्यामुळे हे होणे अपेक्षितच होते. विरोधकांनी काहीही केले तरी पोलखोल यात्रा थांबणार नाही.
कारवाई न केल्यास ठिय्या आंदोलन
पोलखोल सभा मंडपासह बसच्या काचा फोडण्यात आल्या, ही तोडफोड करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, दोषींवर अटक कारवाई न केल्यास ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशाराही विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिला आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.