चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील तरवाडे येथील एका तरूणाने शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील मनोज राजेंद्र पाटील (वय-४०) हा तरूण वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्याला असून शेती व्यवसाय व खासगी नोकरी करून कुटुंबाची उपजीविका भागवित असे. मात्र अचानक तरवाडे शिवारातील आपल्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. तत्पूर्वी सदर घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. व पंचनामा केला. दरम्यान आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोउपनि कुणाल चव्हाण हे करीत आहे.