मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आगामी कार्यक्रमाविषयी नियोजन ठरले असून त्या दृष्टीने तयारीला लागा असे आदेश राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्याना दिले आहेत.
राज ठाकरे यांनी पुणे -ठाणे येथील सभांमधून हिंदुत्ववादी भूमिका घेत आगामी १ मे रोजी औरंगाबाद येथे तर ३ मे पर्यंत भोंगे उतरविण्यासह ३ मे रोजी अक्षय तृतीया असून राज्यभरात महाआरत्या करण्याचे नियोजन आहे. आणि ५ जूनला अयोध्या येथे जाण्याचे निश्चित केले आहे.
त्यानुसार औरंगाबाद येथील १ मे रोजी होणाऱ्या सभेसाठी परवानगी नाकारली जाणार नाही अशी कोणतीही कृती करु नका, सभेला होणारी गर्दी लक्षात घेता, त्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या परवानग्या घेण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर १ मे रोजी औरंगाबाद येथे होणार्या राज ठाकरेच्या सभेत आम्ही काळे झेंडे दाखवू, असा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अशोकराव जाधव,अजहर तांबोळी आणि ताज सिद्दीकी यांनी सभा उधळून लावण्याचे संकेत दिले आहेत.
तर ५ जून रोजी अयोध्या येथे जाण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत चर्चा आणि कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यासाठी सुमारे ९ ते १० रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यासाठी बाळा नांदगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी यांच्याकडे विविध जबाबदाऱ्यांची विभागणी करीत नियोजित सभांचे नियोजन व तयारी पूर्ण करण्याचे निर्देश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.