नोयडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येथील बहुचर्चीत ‘ट्विन टॉवर’ आज सुरक्षितपणे पाडण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड उत्सुकतेचा विषय झालेले नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर आज पाडण्यात आले आहे. यासाठी ४६ जणांची टीम काम करत होती. ही टीम दररोज सुमारे १२ तास स्फोटकं लावण्याचं काम करत होती. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे दोन टॉवर जमीनदोस्त झाले आहेत. इमारत पाडण्यापूर्वी आजूबाजूच्या सोसायटीतील सुमारे ५ हजार लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले होते. याचे काम. एडिफाय इंजिनीअरिंगला देण्यात आले होते.
दरम्यान, ही, इमारत पाडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात धुळीचा सामना करण्यासाठी १०० पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले आहेत. १५ अँटी स्मॉग गन, ६ मेकॅनिकल स्वीपिंग मशीन, सुमारे २०० सफाई कामगार आणि २० ट्रॅक्टर ट्रॉली लावण्यात आल्या आहेत. याशिवाय १०० हून अधिक अग्निशमन बंबही सज्ज ठेवण्यात आले आहेत.