डोणगाव तालुक्यात २०० जनावरांचे मोफत लसीकरण

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यासह जिल्ह्यात व संपुर्ण राज्यभरात मोठया प्रमाणावर ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease Outbreak) वाढत असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपले गाव व पशुपातकांची गुरढोर या संसर्गजन्य आजारापासून सुरक्षित राहावे या दृष्टीकोनातुन आपले कर्तव्य समजून डोणगाव तालुका यावल या ग्राम पंचायतीचे सरपंच व उपसरपंच आणी सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामसेवक यांनी लसीकरणासाठी (Lumpy Skin Vaccination) औषधे आणून २०० जनावरांचे मोफत लसीकरण करून घतले.

लम्पी स्कीन रोगामुळे पशुपालकांमध्ये या संसर्गजन्य आजारा घेवुन सर्वत्र मोठया प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व त्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. हे लक्षात घेत सरपंच आशाताई पाटील यांनी दोणगाव ग्राम पंचायत मार्फत लस आणून गावातील २०० जनावरांना लसिकरण करून घेतले

या लसीकरणासाठी पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.मनोज पाटील डाँ.मेघराज फालक व मदतनीस इंगळे यांचे सहकार्ये व मार्गदर्शन लाभले.

यावेळी सरपंच आशाबाई सुरेश पाटील उप सरपंच मनोहर पांडुरंग भालेराव,बबलू साहेबराव पाटील,शांताराम पाटील,यतीन पाटील,समाधान ठोके व पशुपालक ग्रामस्थ मोठया संख्येत उपस्थीत होते.

Protected Content