यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील गुरे चारणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास आभाटा शिवारात घडली. या घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे.
ज्ञानेश्वर सुका बाउस्कर (धनगर) (वय-५०) रा. डोंगर कठोरा ता. यावल असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, ज्ञानेश्वर बाविस्कर हे आपल्या कुटुंबियासह राहतात. गुरे चारून उदरनिर्वाह करतात. आज आभाटा शिवारात आज १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता गुरे चारत असतांना वीजेच्या कडकडटासह पाऊस सुरू झाला. त्यावेळी ज्ञानेश्वर बाऊस्कर हे टेकडीवर उभे होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने ते टेकडीवरून खाली कोसळले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती सोबत असलेल्या नागरीकांनी सांगितले. याची माहिती मिळताच पोलीस पाटील राजरत्न आढळे, सरपंच नवाज तडवी, तलाठी वसीम तडवी, ग्राप दिलीप तायडे आदीनी धाव घेतली. तातडीने मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्या हळहळ व्यक्त होत आहे.