यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कठोरा येथील चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक नितिन झांबरे यांचा शिक्षक दिनानिमित्त भुसावळ येथे शिक्षक महर्षी पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
भुसावळ येथे रोटरी क्लब ऑफ भुसावल ताप्ती व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने “सन्मान गुरुवार्याचा”अंतर्गत”शिक्षक महर्षी पुरस्कार २०२१”ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन नितिन भास्कर झांबरे यांना गौरविण्यात आले. भुसावळ येथील रॉटरी हॉल मध्ये संपन्न झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळया प्रसंगी नाशिक पदवीधर शिक्षक आमदार डॉ.सुधीर तांबे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, ग.स.चे माजी अध्यक्ष तुकाराम बोरोले, डॉ.संजीव भटकर यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
मिळालेल्या या पुरस्काराबद्दल अ .ध . चौधरी विद्यालयाचे संस्थेचे सर्व संचालक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा पत्रकार डी बी पाटील, पत्रकार राजु कवडीवाले, पत्रकार अय्युब पटेल, पत्रकार अरूण पाटील, पत्रकार शेखर पटेल, पत्रकार सुनिल गावडे, पत्रकार सुधीर चौधरी, पत्रकार तेजस यावलकर, पत्रकार ज्ञानदेव मराठे, पत्रकार महेश पाटील, पत्रकार आर. ई. पाटील, पत्रकार सुनिल पिंजारी, पत्रकार नरेंद्र सपकाळे, पत्रकार भरत कोळी, पत्रकार विवकी वानखेडे आणी पत्रकार दिपक नेवे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्यात .
डोंगरकठोरा येथील मुख्याध्यापक नितीन झांबरे यांना शिक्षक महर्षी पुरस्कार
3 years ago
No Comments