‘डॉ.हेडगेवार नगर’ नावाच्या गावाची स्थापना; धरणगावकरांच्या आनंदाला उधाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव नगरपालिका हददीत समाविष्ट नसलेल्या क्षेत्रासाठी डॉ. हेडगेवार नगर या नावाने स्वतंत्र महसूली गाव स्थापन करण्यात येत असल्याचे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. ‘डॉ.हेडगेवार नगर’ नावाच्या गावाची स्थापना झाल्याचे कळताच धरणगावकरांनी आनंदाला उधाण आले आहे.

 

सप्टेंबर २०२१ मध्ये तत्कालीन माहिती जिलाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी देखील अधिसूचना काढली होती. परंतू नंतर प्रशाकीय कारवाई झाली नव्हती. जळगाव जिल्हा परिषदेची स्थायी समिती यांच्याशी विचारविनिमय करून आणि धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवार नगर या महसुली गावातील ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवार नगर या सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे महसुली गावाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांकापासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे डॉ. हेडगेवारनगर,

 

स्वतंत्र गाव या नावाने ओळखले जाईल तो दिनांक म्हणून १८ जुलै २०२२ हा दिवस विनिर्दिष्ट करीत आहेत. दरम्यान, शासनाचे उपसचिव पी. डी. देशमुख यांच्या नावे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे.प्रारूप अधिसूचना  २० जानेवारी २०१९ रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे. त्यामुळे या नव्या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, असेही या पत्रात म्हटले होते.

 

धरणगावात आनंदोत्सव साजरा

डॉ. हेडगेवार यांच्या नावाने नवीन गावाची स्थापना होत असल्याचे काळताच धरणगावकरांच्या आनंदाला उधाण आले. धरणगावात फाटके फोड्न आणि पेढे वाटून मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गावातील मान्यवरांनी बैठक घेत या निर्णयाचे स्वागत केले. या बैठकीला प्रा. आर. एन महाजन सर, संघ परिवाराचे बाळसाहेब चौधरी, सुनील वाणी. एमएच. चौधरी, दत्तात्रय चौधरी, चंद्रशेखर अत्तरदे, मंदार चौधरी, राजेंद्र गांगुर्डे, अनिल देशमाने, वैभव बोरसे, प्रा. ए. आर पाटील, प्रा. डी. डी. पाटील, शिरीष बयस, संजय महाजन, कन्हैय्या रायपुरकर, दिलीप महाजन यांच्यासह गावातील अनेक

 

तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशात नेमकं काय म्हटले होते? की, राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून प्राप्त झालेल्या दुरध्वनी संदेशानुसार तत्काळ हा आदेश देण्यात येत असल्याचे या संबंधातील पत्रात म्हटलेले होते. तसेच या भागासाठी डॉ. हेडगेवार नगर या नावाने स्वतंत्र महसूली गाव स्थापन करण्याचा प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४ चे पोटकलम (४) नुसार डॉ. हेडगेवार नगर महसूली गाव स्थापन करण्यासाठी मान्यवर उपस्थित होते.

 

Protected Content