डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन महाविद्यालयात दहीहंडी उत्साहात साजरी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचालित डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर  अप्लिकेशन महाविद्यालयात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

 

गोदावरी फाऊंडेशन संचालित डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर  अप्लिकेशन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा वारके यांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दहीहंडीच्या कार्यक्रमास प्रारंभ केला.  यावेळी त्यांनी उपस्थितांना श्रीकृष्ण जयंतीच्या शुभेच्छा देत विद्यार्थिनींना मार्गदर्शन  केले. यात त्यांनी दहीहंडी फोडताना जसे थर मांडले जातात त्याला एक पाया असतो आणि तोच पाया महत्वाचा असतो.  जर पायाच कमकुवत असला तर वरचे थर लगेच पडतील. त्याप्रमाणे जर  तुम्ही शिक्षण घेतांना पाया मजबूत केला तर आयुष्यात तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही.  निरंतर वाचन व सराव हा कधीही लाभदायक राहतो. आपले ज्ञान  नेहमी अद्ययावत ठेवा.  कारण कंपनीमध्ये काम करताना तुम्हाला त्याची गरज पडेल.  त्याचबरोबर शिक्षण घेताना आपण महाविद्यालयात काही कार्यक्रमामध्ये भाग घेतला की आपल्यामध्ये नेतृत्व, आत्मविश्वास आदी गुण वाढतात व त्याचा फायदा आपल्याला कंपनीमध्ये होतो. आपण टीम वर्क व समन्वय शिकले पाहिजे ते खूप महत्वाचे आहे. कंपनीमध्ये तसेच अपेक्षित असते. यावेळी महाविदयालयामधील विद्यार्थिनींनी कृष्ण व राधाचा वेश  धारण करून वेगवेगळे नृत्य सादर केले. कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content