जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ.वर्षा पाटील कॉलेज ऑफ होमसायन्स येथे नुकताच पदवीप्रदान समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील या तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुशांत साळुंके, सॅटर्डे ग्लोबल क्लबच्या डॉ.वृषाली छापेकर उपस्थीत होत्या.
मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून विद्यापीठ प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर मान्यवरांनी केंद्र तथा राज्यसरकारच्या महिला उद्योजीकांसाठीच्या विविध योजना, त्यांना जाणवणार्या अडचणी आणि त्यावरील उपायांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्वला मावळे यांनी प्रस्तावना केली. आझादी का अमृत महोत्सव या अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरणही करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व स्टाफ आणि विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.