जळगाव राहूल शिरसाळे । महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ शहरातील १६ व्यापारी संकुलांमध्ये टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलनातील गाळेधारकांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून किडनी बेचो आंदोलन केले.
महापालिकेच्या व्यापारी संकुलनांतील गाळेधारकांना अवाजवी बिले देण्यात आली आहेत. ही बिले भरणे हे गाळेधारकांना शक्य नसून या बिलामध्ये वाजवी दर आकारणी करावी. व्यापारी संकुलातील गाळेधारक सधन नसून त्यांच्या व्यवसायात त्यांना परवडत नाही. यातच ५ पट दंडासह महापालिकाने बिलांची आकारणी केलेली आहे. यासोबतच महापालिका प्रशासनातर्फे काही व्यापारी संकुलानातील थकबाकी असलेल्या गाळेधारकांची गाळे सील करण्यात आलेली आहे. याचा विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. आम्हाला महापालिकेची थकबाकी भरावयाची असल्याने आमच्या शरीरातील अवयव विकण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली. अवाजवी बिल आकारणी मागे न घेतल्यासगाळेधारकांना फासी घेण्याशिवाय गत्यंतर उरणार नसल्याचा इशारा गाळेधारकांनी दिला. याप्रसंगी कृष्णा पाटील, विनोद नेवे, युवराज वाघ, दिलीप भामरे, आशिष सपकाळे, नानाभाऊ पवार, रत्नाकर खैरनार, अजय पाटील, अमित मानकर आदी उपस्थित होते.
भाग १
https://www.facebook.com/508992935887325/videos/451414756080110
भाग २
https://www.facebook.com/508992935887325/videos/882298905944955
भाग ३
https://www.facebook.com/508992935887325/videos/505275377153816