जळगाव, प्रतिनिधी | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दैववादाला पराभूत केले आहे.मात्र संविधानाला हळद कुंकू लावून दैविकरण करण्याचा प्रयत्न अज्ञानातुन केला जातो.पूजा घालणारे लोक विचार करण्याची क्षमता नसणारे आहेत.मानवी कल्याण सांगणाऱ्या संविधानाबाबत साक्षरता होण्याची गरज आहे. असे परखड विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत पत्रकार उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले. ते संविधान जागर समिती व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमत आम्ही भारताचे लोक या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी करीम सालार हे होते.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते उत्तम कांबळे म्हणाले की, मी पणाने राष्ट्र तयार होत नाही, राष्ट्र आम्ही म्हणूनच तयार होत असते.ज्या दिवशी जाती जन्माला आल्या त्या दिवशी राष्ट्र मरण पावले. जाती मुळेच मी पणा वाढीस लागतो. म्हणून आम्ही भारताचे लोक हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला विचार हा देशाची खरी ताकद आहे. प्रास्ताविक संविधान जागर समितीचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी केले. मंचावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे, डॉ.मिलिंद बागुल,ईश्वर मोरे,किशोर सुर्यवंशी,भारत ससाणे,दिलीप सपकाळे,अमोल कोल्हे,रमेश सोनवणे, हरिश्चंद्र सोनवणे,चंदन बिऱ्हाडे,वाल्मीक सपकाळे आदी उपस्थिती होते. सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी केले. यशस्वितेसाठी जगदीश सपकाळे,सचिन बिऱ्हाडे, नीलेश बोरा,भारत सोनवणे,हरीश कुमावत, आकाश सपकाळे, भारती म्हस्के,नीलू इंगळे आदींनी परिश्रम घेतले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/436524134615456