डॉ. चंद्रकांत बारेला यांनी आदिवासी प्रकल्प कार्यलयाच्या कारभारावर ओढले ताशेरे

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या कारभारावर आदिवासी प्रकल्प समिती अध्यक्ष डॉ. चंद्रकांत बारेला यांनी ताशेरे ओढत नाराजी व्यक्त करत आदिवासी विकास चा पैसा दिलेल्या खात्यांचा आढावा मागवा अन्यथा निधी देणे बंद करण्याचा ठराव करा अशा सूचना प्रकल्प समितीच्या बैठकीत दिल्यात.

 

डॉ. चंद्रकांत बारेला यांनी यांनी बैठकीत सांगितले की, एकात्मिक आदिवासी विकास खात्यातून दरवर्षी कृषी, वीज मंडळ, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, अशा विविध ठिकाणी विकासात्मक धोरण अवलंबण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी वळवला जात असतो, मात्र पुढे त्या निधीचे काय होते याचा पाठपुरावा होत नाही किंवा त्या – त्या विभागाचे अधिकारी त्यांचा आढावा सादर करीत नाहीत. यापुढे संबंधित खात्याने निधी वापराचा आढावा आदिवासी विकास प्रकल्प समितीच्या बैठकीत जातीने हजर राहून द्यावा, अन्यथा हा निधी देणे बंद करण्याचा ठराव आजच करा अशी सूचना त्यांनी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांना केली. डॉ. बारेला यांनी प्रकल्प कार्यालयाच्या कर्मचारी वर्गांना शिस्त लावण्यापासून सुरुवात केली. त्यांनी सदस्यांची बैठक बोलावण्यासाठी आधी अजेंडा न दिल्याने चांगलेच धारेवर धरत यापुढे अजेंड्याशिवाय मिटिंग बोलवू नये अशी सक्त ताकीद दिली. संपूर्ण जिल्ह्यासाठी जेवणाचे टेंडर केवळ तीन व्यक्ती कशा घेतात असा प्रश्न उपस्थित करत आदिवासी मुलांच्या तोंडचा घास कोणाच्या घशात घातला जात आहे याची आपणास कल्पना असल्याचे त्यांनी स्पष्ट करत यापुढे याबाबत कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा दिला. सर्व शाळांवर जेवणाचे मेन्यू फलक व त्यानुसार दररोजचा आहार वाटप करणे ही शिस्त लावून घेणे, ज्या शाळांची तक्रार आम्ही प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केली असेल, त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी अपेक्षा असतांना जर कारवाई होत नसेल तर मात्र प्रकल्प अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्नशील राहणार आहे. विष्णापूर येथील आश्रमशाळा दुरुस्ती ,शाळाबाह्य मुले या ज्वलंत विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली. विना परवानगी अथवा योग्य कारणाशिवाय जे शिक्षक शाळेत गैरहजर राहत असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश डॉ. बारेला यांनी दिलेत. Neet – Jet परीक्षांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रकल्प स्तरीय व्यवस्था करून देण्यात यावी, न्यूक्लिअर बजेट अंतर्गत व्यक्तिगत लाभार्थी संख्या वाढवावी, लाभार्थी निवड ही पारदर्शक असावी, शबरी घरकुल योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजूंना मिळावा अशा विविध सकारात्मक मागण्या बैठकीत प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत बारेला यांनी आजच्या बैठकीत केल्या. याप्रसंगी यावल प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, प्रकल्प समिती सदस्य मासुम तडवी, एम. बी. तडवी सर, रतन बारेला, प्रताप खाज्या पावरा, संजू जमादार, निलेश जाधव, प्रकल्प कार्यालयातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Protected Content