जळगाव प्रतिनिधी । ख्यातनाम लेखक, समीक्षक प्रा. डॉ. किसन पाटील यांचे आज निधन झाले. उपचार सुरू असतांना त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
खान्देशातील अग्रगण्य साहित्यीकांमध्ये प्रा. डॉ. किसन पाटील यांचा लौकीक होता. मू. जे. महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची कामगिरी देखील मोठी होती. अलीकडच्या काळात व्याधीग्रस्त झाल्याने त्यांना शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांनाच आज दुपारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
प्रा. डॉ. किसन पाटील हे लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून केलेले त्यांचे कार्य हे देखील खूप मोठे आहे. त्यांच्या निधनाने साहित्य व शैक्षणीक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.