डॉ.उल्हास पाटील स्कूलमध्ये दिपोत्सव साजरा 

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल येथे दिवाळी सणानिमित्‍त आकाश कंदिल बनविण्याची कार्यशाळा, फराळ बनिवणे आणि तो खाऊन आनंद लुटण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ येथे दिवाळी निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात दिवाळी सणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये दिवा सजवणे तसेच कंदील बनवणे यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलागुणांना वाव मिळाला. या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्याच्या अंगी असलेली कलाकुसर, नाविण्य तसेच कल्पकतेने केलेल्या दिव्यांच्या व कंदिलांच्या माध्यमातून दिसून आली.

तसेच विद्यार्थ्यांनी यंदा दिवाळीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची शपथ घेतली. तसेच वकॉरिडॉरमध्ये रंगीबेरंगी दिवे लावले आणि रांगोळ्यांनी शाळेची सजावट केली. विद्यार्थ्यांनीही स्वादिष्ट भेळसह सुंदर उत्सवाचा आनंद लुटला. दिवाळी हा सण सर्वांना असत्यतेकडून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि निर्दयतेकडून दयाळूपणा आणि उदारतेकडे घेऊन जाईल… अशा शुभेच्छा देण्यात आल्यात.

Protected Content