जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नुकतीच शैक्षणिक अधिष्ठाता, प्रशासकीय अधिष्ठाता व नॅक समन्वयकपदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शैक्षणिक अधिष्ठाता अर्थात अॅकेडमीक डिनपदी डॉ. नेहा वझे महाजन यांची तर प्रशासकीय अधिष्ठाता अर्थात अॅडमिनीस्ट्रेटिव्ह डिन व नॅक समन्वयकपदी डॉ. जयंत महादेवराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबाबतचे नियुक्तीपत्र गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. एस. आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, पॅथॉलॉजी विभागाच्या प्रो. डॉ. अनघा चोपडे, डॉ. सुयोग चोपडे, सर्जरी विभागातील डॉ. चैतन्य पाटील, इएनटी तज्ञ डॉ. विक्रांत वझे आदींनी शुभेच्छा दिल्यात.