डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मॉलीकुलर डायग्नोस्टीक प्रयोगशाळा तपासणीसाठी सज्ज

जळगाव प्रतिनिधी । नॅशनल अ‍ॅक्रीडेशन बोर्ड फॉर टेस्टींग अ‍ॅन्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज या संस्थेच्या उच्चतम मानांकनाच्या दिशेने वाटचाल करणारी अत्याधुनिक मॉलीकुलर डायग्नोस्टीक प्रयोगशाळा डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.

सोमवारपासून या प्रयोगशाळेत कोरोनाच्या आरटीपीसीआरसह क्षयरोग, कावीळचेही अचूक आणि कमी वेळेत निदान केले जाणार आहे. त्यामुळे रूग्णांचा वेळ वाचून उपचारासाठी त्यांना योग्य दिशा मिळणार आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांच्या संकल्पनेतुन रूग्णांची निकड लक्षात घेता वैद्यकीय महाविद्यालयात मायक्रोबॉयोलॉजी विभागांतर्गत मॉलीकुलर डायग्नोस्टीक प्रयोगशाळेची निर्मीती करण्यात आली आहे. उच्चतम गुणवत्तेचे प्रमाण देणारी नॅशनल अ‍ॅक्रीडेशन बोर्ड फॉर टेस्टींग अ‍ॅन्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज या संस्थेचे मानांकन प्राप्त करण्याच्या दिशेने ही प्रयोगशाळा वाटचाल करीत आहे. खान्देशात एकमेव डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात या प्रयोगशाळेची निर्मीती करण्यात आली आहे.

या तपासण्या होणार
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील मॉलीकुलर डायग्नोस्टीक प्रयोगशाळेत कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी, क्षयरोग आणि कावीळ या गंभीर स्वरूपाच्या आजारांचे अचूक निदान केले जाणार आहे. त्यासाठी युएसए बेस्ड अत्याधुनिक यंत्रणा प्रयोगशाळेत कार्यान्वीत करण्यात आली आहे. रूग्णाच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर त्यांना २४ तासात आजाराचे निदान करणारा रिपोर्ट देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दैनंदीन किमान ५०० रक्तांचे नमुने या प्रयोगशाळेत तपासणी केले जाणार आहे. आत्तापर्यंत रक्ताचे नमुने हे तपासणीसाठी पुणे किंवा मुंबई पाठवावे लागत होते. आता मात्र जळगाव जिल्ह्यातच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात महत्वाच्या आणि गंभीर आजारांचे निदान करणारी प्रयोगशाळा रूग्णसेवेत दाखल होत आहे.

अशी आहे यंत्रणा
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील मॉलीकुलर डायग्नोस्टीक प्रयोगशाळेत लॅब डायरेक्टर म्हणून डॉ. कैलास वाघ, क्वालिटी मॅनेजर म्हणून डॉ. प्रशांत गुड्डेती, टेक्नीशियन मॅनेजर डॉ. हेमंत पाटील, सिग्नेटरी अ‍ॅथॉरिटी डॉ. शिरीष गोंदणे, डॉ. विपीन तोडस, डॉ. विठ्ठल शिंदे यांच्यासह १२ जणांची टीम या प्रयोगशाळेत कार्यरत राहणार आहे. जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आणि ग्रामीण उपरूग्णालयांमध्ये येणार्‍या रूग्णांच्या रक्ततपासणीचीही सुविधा उपलब्ध आहे.

रूग्णांचा वेळेची बचत होणार – डॉ. कैलास वाघ
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील मॉलीकुलर डायग्नोस्टीक प्रयोगशाळा ही अत्याधुनिक स्वरूपाची आहे. या प्रयोगशाळेत तपासणी होणार्‍या रक्त नमून्यांचे अचूक अहवाल २४ तासाच्या आत देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे रूग्णाच्या वेळेची बचत होऊन उपचारालाही योग्य दिशा मिळणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांच्या दुरदृष्टीतून या प्रयोगशाळेची निर्मीती करण्यात आली आहे. सोमवारी दि. १४ पासून ही प्रयोगशाळा रूग्णसेवेसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती लॅब डायरेक्टर डॉ. कैलास वाघ यांनी दिली.

Protected Content