डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे रयतेच्या राजाला मानाचा मुजरा 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे  रविवार दी.१९ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. तसेच सायंकाळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली तसेच पोवाड्याचेही सादरीकरण करण्यात आले.

गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ उल्हास पाटील, श्री व सौ डॉ सुहास बोरले, अधिष्ठाता डॉ आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्या हस्ते दीप्रज्वलन करीत छञपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या आणि जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला. मान्यवरांनी देखील फेटे परिधान करत सोहळ्यात सहभागी झाले.

रक्‍तदान शिबिरासाठी डॉ उल्हास पाटील रक्तपेढीचे डॉ भारंबे, डॉ शेख आदिंचे सहकार्य लाभले. तब्बल ८१ रक्त पिशव्यांचे शिबिरातून संकलन झाले. विद्यार्थ्यांसह सुरक्षारक्षकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या शिबिरासाठी डॉ उल्हास पाटील रक्तपेढीचे अनमोल सहकार्य लाभले.

डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालयातर्फे रॅली 

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्‍त डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालयातर्फे रविवार दि.१९ फेब्रुवारी रोजी रॅलीचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ.दिलीप पाटील यांच्यासह स्टाफने रॅलीत सहभागी होवून शिवजयंतीचा उत्सव जल्‍लौषात साजरा केला. विद्यार्थ्यांनी देखील यात हिरीरीने सहभाग घेतला. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांबद्दल माहिती देऊन त्यांचे विचार अंगीकारावे असे आवाहन डॉ.पाटील यांनी यावेळी केले.

Protected Content