डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर व्याख्यान

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जागतिक एड्स दिनानिमित्त गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृतीपर व्याख्यानचा कार्यक्रम घेण्यात आला.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रवेशित प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील अनिकेत हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, मायक्रोबायोलॉजी पाध्यापक तथा अ‍ॅडमिनीस्ट्रेटिव्ह डिन डॉ.जयंत देशमुख, फाउंडेशन कोर्स चे प्रमुख डॉ विठ्ठल शिंदे हे होते. जागतिक एड्स दिवस आणि एड्स जनजागृती सप्ताहाचे आज उद्घाटन झाले.

याप्रसंगी डॉ.देशमुख यांनी एड्सच्या आजाराचे देशावरील संक्रमण, आव्हान काय आहे, त्याचा प्रतिकार कसा केला जाऊ शकतो तसेच एक वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी म्हणून आपली भुमिका काय असावी अशा विविध मुद्दंयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्वच विभागांचे प्रमुख तसेच कम्युनिटी हेल्थ सायन्स विभागातील स्टाफ उपस्थीत होता.

Protected Content