डॉ. आचार्य विद्यालयात अभिवाचन महोत्सवास प्रारंभ (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ.अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभागात अभिवाचन महोत्सवात स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला.नवरात्र निमित्ताने स्त्री शक्तीचा महिमा व त्यांच्या कार्याची महती सर्वांना व्हावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाची सुरुवात पहिल्या थोर स्त्री शिक्षिका “सावित्रीबाई फुले” यांच्या जीवनकथेचे वाचन करून करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास, त्यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य,समाजविरुद्ध त्यांनी केलेला संघर्ष, त्यांची शिकवण्याची जिद्द आदी गोष्टीवर या कथेत प्रकाश टाकण्यात आला. या अभिवाचनाचे वैशिष्ट्य म्हणजे यात प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचा शिक्षकासह समावेश आहे. अभिवाचन महोत्सवाची संकल्पना मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांची असून सावित्रीबाई फुले या कथेचे लेखन .सविता चौधरी व प्रतिभा चौधरी यांनी तर दिग्दर्शन प्रमोद इसे यांनी केले आहे. अभिजित पाटील,मानसी वाणी, सई पाटील, पार्थ झोपे, सीमा पाटील, सीमा जोशी, सुनीता तडवी , तुषार पुराणिक, विजय पाटील आदींनी अभिवाचनात सहभाग घेतला.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/349474939595203/

 

Protected Content