जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी.बेंडाळे महिला महाविद्यालयातील फोटोग्राफी-व्हिडिओग्राफी व फिल्म आणि ड्रामा विभागातील विद्यार्थ्यांनी नियोजित केलेल्या “वर्तुळ” या लघुचित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौरी राणे यांच्या हस्ते झाला.
याप्रसंगी डॉ. व्ही. जे. पाटील, प्रा. पी. एन. तायडे, प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. संजय रणखांबे, प्रा. अशोक पाटील, प्रा. दीपक किनगे, प्रा. विनोद नन्नवरे, प्रा. सुचित्रा लोंढे तसेच फोटो व व्हिडिओग्राफी विभाग प्रमुख प्रा. राज गुंगे उपस्थित होते. या संपूर्ण लघुपटाचे चित्रीकरण, संकलन, ध्वनीमुद्रण हे विभागाचे विद्यार्थी करत आहेत. चित्रपट क्षेत्रात खांदेशचा सहभाग वृद्धींगत व्हावा या उद्देशाने महाविद्यालयात हा विभाग सुरु करण्याचा हेतू साध्य होताना दिसत आहे असे गौरवोद्गार उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
या लघुचित्रपटाचे लेखन सोनल चौधरी, दिग्दर्शन- गायत्री सोनार व नीता वाल्हे, छायाचित्रण- यश अहिरराव व उर्वशी शिंदे, कला दिग्दर्शन– निखील शिंदे, पूनम भोई आणि तांत्रिक बाजू- जय सोनार, प्रणीत जाधव, दिनेश बारी, निखील खोंडे, भाग्यश्री अमृतकर, भूषण भोई, अनुराग सोनार असून. भूमिकेत- प्रतीक्षा झांबरे, चंद्रकांत चौधरी आणि प्रा. राज गुंगे आहेत. या लघुपटासाठी राकेश वाणी, एस.पी. चौधरी यांचे सहकार्य आहे.