जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरात काल शुक्रवार दि. १३ मे रोजी मोठ्या प्रमाणत कारवाई करत महापालिकेच्या पथकाने ६ टन प्लास्टिक बॅग जप्त केल्या. ह्या बॅग पर्यावरण संवर्धनासाठी व प्राण्यांच्या आरोग्यासाठी हानीकारक असतात याचा प्रत्यय आज पाहण्यास मिळाला. एका गायीच्या पोटात तब्बल ५५ किलो प्लास्टिक बॅग आढळून आल्यात. सुदैवाने डॉक्टरांनी त्या यशस्वी शस्त्रक्रिया करून त्या बाहेर काढल्या आहेत.
याबाबतची हकीकत अशी की, हरी विठ्ठल नगरात एक गाय सुस्त पडून होती. यामुळे परिसरातील नागरिकांनी तिला जिल्हा पशु सर्वचिकित्सालय येथे दाखल केले. पशुसंवर्धन सहा. आयुक्त डॉ. मनीष बाविस्कर, पशुधन विकास अधिकारी डॉ. निलेश चोपडे, सहायक प्रफुल जोशी, किशोर जानवे यांच्या वैद्यकीय पथकाने या गायीची शर्तीचे प्रयत्नकरून शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून तब्बल ५५ किलो प्लास्टिक बॅग, खिळा, एक एक रुपयाचे दोन नाणे बाहेर काढण्यात आले. नागरिक भाजीपाला उर्वरित कचरा प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये टाकून फेकून देतात. जनावरे ही चारा समजून ती प्लास्टिक कॅरी बॅग खात असतात. याच प्रमाणे या गायीने देखील वर्षानुवर्षे अशा प्रकारचे प्लास्टिक खाल्याने तिच्या पोटात हे सर्व साचत गेले. आज तिच्या पोटात प्लास्टिक शिवाय काहीच नव्हते. यामुळे तिला श्वास घेण्यासाठी त्रास होवू लागला होता. तिची पचनक्रिया बंद पडल्याने ती एकदम सुस्त पडलेली होती. नागरिकांनी भाजीपालाचा उर्वरित भाग प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये न टाकता केवळ कागदात किंवा असाच टाकून द्यावा असे आवाहन डॉ. मनीष बाविस्कर यांनी केले आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/979411209440363