डी.बी. जैन रुग्णालयातील प्रसूतिगृह पूर्ववत सुरु करा – उपमुख्यमंत्र्यांकडे धर्मरथ फाउंडेशनची मागणी

जळगाव, प्रतिनिधी | येथील छत्रपती शिवाजीनगर मधील मनपा रुग्णालय प्रसूतिगृह पूर्ववत सुरु करा अशी मागणीचे निवेदन धर्मरथ फाउंडेशनतर्फे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना देण्यात आले.

 

निवेदनाचा आशय असा की, शिवाजीनगर येथे मनापालीकेचे डी. बी.जैन महिला प्रसूती रुग्णालय आहे. येथे प्रभागातील, शहरातील तसेच ग्रामीण भागातील गोर गरीब महिला ह्या प्रसूतीसाठी येत असतात. हे प्रसूतिगृह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आले आहे. हे प्रसूतिगृह पुन्हा सुरु ह्वावे यासाठी धर्मरथ फाउंडेशनतर्फे आरोग्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, याबाबत अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तरी ना. पवार यांनी जातीने लक्ष घालून हे प्रसूतिगृह पूर्ववत सुरु करावे अशी मागणी धर्मरथ फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी केली आहे.

Protected Content