जळगाव, राहूल शिरसाळे । पिंप्राळा शिवारातील शेतकर्यांची डीपी जळाल्यानंतर त्यांनी वारंवार मागणी करून देखील त्यांना जोडणी मिळत नसल्याने ते त्रस्त झाले आहेत. वीज नसल्याने त्यांना पीकांना पाणी देता येत नसल्याने आपली दखल घेऊन तातडीने कनेक्शन मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
नवी बरखंडी पिंप्राळा शिवारातील डीपी मागील एक महिन्यापासून जाळली आहे. ही डीपी दुरुस्त करण्यात यावी अशी वारंवार मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. शेतात विहीर वट्यूबवेल आहे मात्र, वीज नसल्याने शेतातील पिकांना वेळेवर पाणी देऊ शकत नाही अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. या परिसरातील काही शेतकऱ्यांनी वीज बिल भरलेले नाही, परंतु आम्ही वीज बिल भरून देखील डीपीची दुरूस्ती करण्यात येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतात ट्यूबवेल व विहीरीला पाणी आहे पण विजे अभावी गुरांना पिण्यासाठी पाणी देता येत नसल्याची खंत राजू महाजन, रमेश यादव धनगर, छोटू धनगर, मधु महाजन, सुनील महाजन, मनोज धनगर या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मागील एक महिन्यापासून डीपी दुरूस्ती तक्रार मार्गी लागत नसल्याने आपण थेट पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना भेटणार असल्याचे या शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/2006286482854306