जळगाव, प्रतिनिधी । ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हिंदुराष्ट्र सेनेतर्फे लालबहादूर शास्त्री टॉवर चौकात आंदोलन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयामध्ये एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सबद्दल देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे लक्षात आहे. ‘डिसमेन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ असे या कॉन्फरन्सचे नाव असून ही कॉन्फरन्स १० ते १२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ‘ऑनलाईन’ होणार आहे. या कार्यक्रमात ‘बहिष्कार घालणारा नागरिकत्व सुधारणा कायदा’ यावर चर्चा होणार आहे. हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा अशी मागणी हिंदू राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मोहन तिवारी यांनी केली आहे. श्री. तिवारी पुढे म्हणाले की, वास्तविक, अफगाणिस्तान आणि धर्माच्या आधारावर फाळणी होऊन भारतापासून विलग झालेले पाकिस्तान, बांगलादेश या इस्लामी देशांत होणार्या छळामुळे भारताचा आश्रय घेणारे हिंदु, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन, पारशी यांना भारतीय नागरिकत्व देण्याविषयीचा ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ या एक पथदर्शी कायदा आहे. या देशांतील मुसलमानांना भारताचे नागरिकत्व नाकारण्यात आलेले नाही किंवा त्यांना भारतात प्रवेश करण्यापासूनही रोखण्यात आलेले नाही. याप्रसंगी नरेश सोनवणे, सचिन इंगळे, आशिष साखरे, प्रवीण कोळी, भैय्या चौधरी, हभप वरसाळेकर महाराज, मयूर सिंधी, सुनील सैदाणे, मयूर सोनार, रुपेश माळी, जितेंद्र नरखेडे, अजय मंधान आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/276585660971317