ठेकेदारला मजूरांकडून मारहाण; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । ऊसतोड करणाऱ्या मजूरांनी काम न करता ठेकेदाराकडून पैसे घेत काम न करता शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पहूर पोलीसात सात मजूरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, फकिरा तुकाराम हातागळे (वय-४८) रा. तलवाडा ता. गेवराई जि. बीड हे ऊस तोड करण्याचे कामाचे ठेके घेतात. दरम्यान २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील वाकोद रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ पहूर व शेंदुर्णी येथील ऊसतोड मजूर यांना कामावर घेण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी मजूरांना एकुण काम करण्याचे ४ लाख रूपये दिले. यावेळी मजूरांनी पैसे घेतले परंतू कामावर जाण्यास नकार दिला आणि फकिरा हातागळे यांच्या ताब्यातील उर्वरित रक्कम ५० हजार रूपये हिसकावून घेतले. तर शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी फिकीरा हातागळे यांनी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अहमद तडवी, कलीम सलीम तडवी, फकीरा आमीर तडवी, गुलाबर अब्बास तडवी, सांडू मोहताब तडवी, बशीर मेहताब तडवी सर्व रा. पहूर ता. जामनेर आणि शरीफ सिकंदर तडवी रा. शेंदुर्णी ता. जामनेर यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय बनसोड करीत आहे.

Protected Content