जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील उमाळा-धानवड रस्त्यावर ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याने उलटल्याची घटना सोमवारी 6 जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. यात चालकाचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाला असून तीन ते चार मजूर जखमी झाले आहे. जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
राजेंद्र मगरे (३५, रा.निमगाव, ता.जळगाव) असे मृत चालकाचे नाव आहे
याबाबत माहिती अशी की, राजेंद्र मगरे हा चालक ट्रॅक्टरमध्ये विटा घेवून जामनेर येथे गेला होता. त्याच्यासोबत तीन ते चार मजूर सुध्दा होते. सायंकाळी विटा पोहचवून ट्रॅक्टर पुन्हा परतीला येते होते. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उमाळा-धानवड रस्त्यावर अचानक ट्रॅक्टर उलटला. या ट्रॅक्टरच्या खाली दबून चालक राजेंद्र मगरे हे गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर मजुरही जखमी झाले. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेवून जखमींना रूग्णालयात उपचारार्थ हलविले. तर राजेंद्र मगरे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.