अहमदाबाद (वृत्तसंस्था) जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियमचे उदघाटन अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष उद्या करणार होते. परंतू त्याआधीच या स्टेडीअमचे गेट कोसळल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
अहमदाबादमधील या मोटेरा स्टेडिअममध्ये ट्रम्प यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मोटेरा स्टेडिअमच्या बाहेर उभ्या केलेल्या तात्पुरत्या गेटमधून आत जाणार होते. परंतू हे गेटच आज (शनिवार) कोसळले. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, ट्रम्पच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच ही घटना घडल्याने यंत्रांनी चौकशी सुरू केली आहे. तर या दुर्घटनेमुळे सीआयए सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची शक्यता आहे.