ट्रक-दुचाकीच्या धडकेत महिला जागीच ठार; ट्रकचालकास अटक

जळगाव प्रतिनिधी । नशिराबादला सिमेंट भरण्यासाठी जात असलेल्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील जागीच मृत्यू झाला. महामार्गावर कालिका माता मंदिराजवळ हा अपघात झाला.

आजच्या अपघातात रेहान बी शेख तस्लिम ४२ रा. उस्मानिया पार्क असे मयत महिलेचे नाव अाहे.  याप्रकरणी ट्रकचालक फिरोज शहा कालु शहा वय ३७ रा.रचना कॉलनी, जळगाव यास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ट्रकचालक व मालक फिरोज शहा  हे त्यांचा ट्रक (क्र. एम.एच १५ ई क्यू ७८५७) मध्ये सिमेंट भरण्यासाठी नशिराबाद कडे जात होते . याचवेळी रेहान बी शेख तस्लीम ह्या दुचाकी (एम.एच १९ बी.टी.९९७१) वरुन शहरात येत होत्या. कालिका माता मंदिराजवळ महामार्गावर ट्रकने दुचाकीला धडक दिली . यात दुचाकीवरुन खाली पडल्यानंतर जागीच रेहानबी यांचा  मृत्यू झाला.  त्यांचे पती व लहान मुलगीही सोबत होती ते सुदैवाने बचावल्याची माहिती मिळाली आहे. महिलेकडे असलेल्या महानगरपालिकेच्या ओळखपत्रावरून तिची ओळख पटली.

*पाठलाग करुन पसार ट्रकचालकास पकडले*
अपघाताची माहिती मिळताच  एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे,  सहाय्यक फौजदार आनंद सिंग पाटील,  गोविंदा पाटील, आसीम तडवी, निलेश पाटील, मुदस्सर काजी, भूषण सोनार यांनी घटनास्थळ गाठले. अपघातानंतर ट्रकसह चालक पसार झाला होता त्याचा पाठलाग करून काही अंतरावर पोलिसांनी त्याला पकडले . यानंतर कर्मचार्‍यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला . ट्रकसह चालकास ताब्यात घेण्यात आले असुन याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

Protected Content