ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; ट्रकचालक फरार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौकात ट्रकच्या धडकेत अक्सानगरात राहणाऱ्या वृध्द वाहनासह खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. ही घटना २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली असून ट्रक घेवून चालक फरार झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख इमाम नुरमोहम्मद (वय-६४) रा. अक्सानगर, जळगाव हे जळगाव शहरात किरकोळ व्यापारी आहे. सिझनेबल व्यवसाय करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. २३ फेब्रुवारी ते कामाच्या निमित्ताने (एमएच १९ एएस ३६३) क्रमांकाच्या दुचाकीवरून अक्सानगरातून अजिंठा चौफुलीकडे जाण्यासाठी निघाले. अजिंठा चौफुलीजवळ भुसावळकडून धुळे कडे जणाऱ्या ट्रक (जीजे १८ एटी ९६३९) वरील चालकाने पोलीसांच्या सुचनेचे पालन न करता आणि परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात शेख इमाम दुचाकीवरून खाली पडल्याने त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक ट्रक घेवून फरार झाला आहे.  त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज २५ फेब्रुवारी सकाळी शेख इमाम नुर मोहम्मद यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे. 

Protected Content