जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. रविवारी ३१ जुलै रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसीफ अली बशरत अली (वय-३८) रा. बिलाल चौक, तांबापूरा, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. आसीफ हे आपल्या चारचाकी वाहनाने रविवारी ३१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शिवकॉलनीकडून शहरात येत होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे नुकसान झाले असून कारचालक आसीफ अली बशरत अली हे किरकोळ जखमी झाले आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून ट्रकचालकाविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ट्रकचालक मुकेशकुमार ललन यादव रा. भोजपूर, बिहार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी करीत आहे.