जळगाव प्रतिनिधी । कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या एका 40 वर्षीय व्यक्तीच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पाळधी पोलिसांनी धाव घेतली असून पंचनाम्याचे काम सुरू आहे.
मयत राजेद्र किसन केवारे (वय 40 रा.पिंप्राळा) हे जळगाव एसटी डेपोत वाहक आहेत. पाच मिनिटात बाहेरून जाऊन येतो असे सांगून घरून बांभोरी येथे निघाले होते. दुचाकी (एमएच १९- ५२४३) ने परतत असताना एसएसबीटी महाविद्यालयासमोर एका अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 11.30 ते 12 वाजेच्या दरम्यान झाला. राजेंद्र केवारे याची नुकतीच धुळे डेपो येथून जळगाव डेपोला बदली झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी योगिता, कुणाल आणि सुमित असे दोन मुले असा परिवार आहे. पाळधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्याचे काम सुरू आहे.