टॉवर चौकात पोलीसांशी हुज्जत घालणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील टॉवर चौकात मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करतांना पोलीसांशी हुज्जत घालणाऱ्या दाम्पत्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार समशेर तडवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल आनंदा राठोड, ललित भदाणे, महिला पोलीस कर्मचारी अलका वानखेडे, पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे हे शुक्रवारी १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शहरातील टॉवर चौक येथे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी उभे होते. त्यावेळी (एमएच १९ बीडब्ल्यू ८२०२) वरील चालक नारायण प्रकाश जगताप (वय-३६) आणि त्यांची पत्नी दिपाली नारायण जगताप (वय-३०) रा. खोटे नगर जळगाव हे विना मास्क शहरात फिरत होते. त्यावेळी शहर पोलीसांनी त्यांची दुचाकी अडवली त्यावर यातील महिला दिपाली जगताप हिने पोलिसांची हुज्जत घातली, आणि “पोलीस कर्मचारी हे पैसे खातात, पोलीस हे वाळेचे पैसे घेतात, यासाठी आम्ही आता उपोषणास बसणार” अशी दमदाटी केली. याप्रकरणी पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नारायण प्रकाश जगताप व त्यांची पत्नी दिपाली नारायण जगताप यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी

Protected Content