टॉवर चौकातील फोम अँड फॅब्रिक्स दुकानाला किरकोळ आग (व्हिडिओ)

 जळगाव प्रतिनिधी । टॉवर चौकातील फोम अँड फॅब्रिक्स या दुकानाच्या वरच्या मजल्यावर एसीला अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे किरकोळ आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले आग लागण्यापूर्वीच विझविण्यात यश आले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील शास्त्री टॉवर चौकात श्री. छाबडा यांच्या मालकीचे फोम अँड फॅब्रिक्स नावाचे दुमली शोरूम दुकान आहे. या ठिकाणी कपडे व इतर वस्तूची विक्री केली जाते. आज गुरूवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर असलेल्या हॉममध्ये लावण्यात आलेल्या एसीला शॉर्टसर्कीट झाले. त्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणावर धुर निघाला. ही बाब येथील उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने दुकान मालक छाबडा यांना माहिती देण्यात आली. छबडा यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. काही मिनीटाच्या आत अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन पथकाचे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहा.अग्निशमन अधिकारी सुनील मोरे, कर्मचारी- वसंत न्हावी, भारत बारी, भगवान पाटील, रवी बोरसे, नितीन बारी, अश्वजित घरडे, तेजस जोशी घटनास्थळी जावून सुरू असलेले एसीचे विद्यूत कनेक्शन बंद केले. यावेळी सुदैवाने किरकोळ आग लागल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. यावेळी एसीशिवाय इतर कोणतेही नुकसान झालेले नव्हते. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/894620024511074

Protected Content