*पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युजप्रतिनिधी* | पतीसोबत वडिलांना दवाखान्यात भेटण्यासाठी जात असताना टेम्पो ट्रव्हलरने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३३ वर्षीय विवाहिता जागीच ठार झाल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील वरखेडी येथील सुल्ताना बी शकील काकर (वय – ३३) हे दुचाकीने दि. १४ फेब्रुवारी रोजी आपल्या पतीसोबत वडिलांना दवाखान्यात भेटण्यासाठी जात असताना शहरातील रेल्वे उड्डाणपूलानजीक त्यांच्या दुचाकीस जारगाव चौफुलीकडुन भडगावच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर (क्रं. एम. एच. १९ – वाय – ६३८५) ने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागील बाजुस बसलेल्या सुल्ताना बी शकील काकर ह्या खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती चिंताजनक असल्याने सुल्ताना बी शकील काकर यांना पुढील उपचारासाठी जळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेतील टेम्पो ट्रॅव्हलर व चालक यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे करीत आहे. मयत सुल्ताना बी शकील काकर यांचे पाश्चात्य पती, एक मुलगी, दोन मुले असा परिवार असुन त्यांचे निधनाने वरखेडी सह परिसरात शोककळा पसरली आहे.