भडगाव प्रतिनिधी। कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित टी.आर.पाटील विद्यालय वडजीच्या विद्यार्थ्यानी एलिमेंटरी,इंटरमिजिएट व जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
एलिमेंटरी परीक्षेस २७ विद्यार्थी तर इंटरमिजिएट परीक्षेस २९ विद्यार्थी प्रविष्ठ होते. यात अनुक्रमे ए ग्रेड राधिका योगेश पाटील, बी ग्रेड सृष्टी रविंद्र पाटील, तनुश्री विलास वाघ, प्रियंका कैलास पाटील,वैष्णवी रामकृष्ण पाटील,रोशनी धनराज सुतार,अश्विनी जितेंद्र पवार सह इतर सर्व विद्यार्थी सी ग्रेड प्राविण्याने यश संपादन केले असून परीक्षेचा निकाल १००% लागला. तसेच जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेत अनुक्रमे जान्हवी राजेंद्र पाटील,दिव्या रविंद्र गायकवाड या विद्यार्थीनींची विशेष जिल्हास्तरीय गुणवत्ता पुरस्कारासाठी निवड झाली.
यशस्वी विद्यार्थ्यांना गुणवंत पुरस्कार प्राप्त कला शिक्षक वाय.ए.पाटील,मुख्याध्यापक डी.डी.पाटील,बी.वाय.पाटील, एस.जे.पाटील यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर वृंद यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी,विस्ताराधिकारी विजय कुमावत,विस्ताराधिकारी गणेश पाटील, केंद्रप्रमुख संजय न्याहिदे,केंद्रप्रमुख रविंद्र सोनवणे यांनी अभिनंदन केले.