विटनेर येथे उद्या संत श्रावणबाबा यात्रोत्सव

vitner shravan baba

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील विटनेर येथे माघ शु.अष्टमी म्हणजे २फेब्रुवारी रविवार रोजी विटनेर येथील जागृत देवस्थान गावाचे परम दैवत संत श्रावणबाबा यात्रोत्सव पार पडणार आहे.

या यात्रा उत्सवाला पौराणिक असा इतिहास आहे.संत श्रावणबाबांचे संजिवन समाधी स्थान असलेले तापीकाठावरील कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेले लहानसे पण आदर्श गाव म्हणजे विटनेर. या गावाने तालुक्यापासून थेट राजधानी दिल्लीपर्यंत मजल मारून पंचक्रोषीत स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. सर्व समाजबांधव गुण्यागोविंदाने एकमेकांच्या हातात हात घेवून सुखदुःखात सहभागी होतात.अनेक चढउतार या गावाने पाहिले आहेत. वारकरी सांप्रदयाची थोर परंपरा येथील मातीला लाभली आहे.दरवर्षी आषाढी तसेच कार्तिकी एकादशीला पायी दिंडीचे आयोजन केले जाते.प्रत्येक एकादशीला किर्तन तसेच हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. रोज प्रभात फेरी व हरीनाम पठन होते त्यामुळे हरिपाठ अबालवृध्दांच्या मुखोद्गत आहे.ज्ञानेश्‍वरी,भागवत,गाथा पारायण असे विविध संस्कारक्षम उपक्रम येथे वर्षभर राबविले जातात ज्यामुळे नवीन पिढीवर आपोआप संस्कार होत आहेत.

यात्रेसाठी पूर्ण गाव १० दिवस अगोदर एकत्र येवून पूर्ण गावाची सफाई व घरांची रंगरंगोटी केली जाते.तापी काठावर निसर्गरम्य वातावरणात नवस फेडण्याचा कार्यक्रम असतो.त्यात वरणभात,बट्टी,वांग्यांची भाजी असा स्वादीष्ट मेनू असतो. या दहा दिवसात कुणीही बाहेरचा पाहूणा उपाशी जात नाही.नोकरी किंवा व्यवसाया निमित्त बाहेर गेलेले ग्रामस्थ सुटी घेऊन गावातील यात्रेला हजेरी लावतात. परीसरातील दूकानदार आपली दूकाने थाटतात.मिठाई,खेळणी यांची रेलचेल असते.मनोरंजना साठी लोकनाट्याचे आयोजन असते. परीसरातील गावांमधील भाविक याला उपस्थिती लावतात

माजी जि.प.सदस्य इंदिराताई पाटिल यांचे कुशल नेतृत्व गावाल लाभले आहे.ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सोसायटी वर पूर्ण महिलाराज आहे. गावात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी भव्य सभागृह बांधून गावाची सोय केली आहे.

Protected Content